शबरीकुंभ कशासाठी
गुणवंतसिंग कोठारी
आपला भारतदेश पुण्यभूमि आहे. आपले महत् भाग्य आहे की आपला मानव जन्म या पुण्यभूमीतच झाला आहे. त्याबद्दल आपण परमेश्वराचे आभारच मानले पाहिजेत. जडामध्येही चैतन्य मानण्याची इथली संस्कृती आहे. म्हणुनच नदी, पर्वत , झाडे, पशु, पक्षी या सर्वांना चैतन्यमय मानले आहे. या भूमीला केवळ भूमी मानून कृतघ्नपणा करण्याचे धाडस आमच्यात नाही. आम्ही भूमीला मातृभूमी मानून वंदनच करू. या भरतखंडामधील ही संस्कृती अबाधित राखण्यासाठी सांस्कृतिक हेतुने पूज्य शंकराचार्यांनी देशाच्या चार टोकांना कुंभमेळ्याच्या परंपरांना सुरूवात केली. प्रयाग, उज्जैन, हरिद्नार आणि नाशिक या ठिकाणी भरणारा कुंभमेळा या देशाचया सांस्कृतिक एकते चे प्रतीक आहे.या देशात सांस्कृतिक एकता जपण्याचे कार्य जरी कुंभाच्या माद्यमातून होत असले तरी देशाला त्यासाठी वेगळे प्रयत्न करणयाची गरज भासमी नाही.कोणतेही निमंत्रण न पाठवता ठरलेल्या दिवशी त्या तीर्थक्षेत्रांवर लाखो भाविक येतात, स्नान संध्या करतात आणि धर्मकार्य करत असतात. हजारो वर्षांची हीच परंपरा आहे.
साभार: सांस्कृतिक वार्तापत्र शबरीकुंभ विशेषांक 26-जानेवारी-2006