वाल्मीकीच्या दृष्टीतून शबरी-दर्शन
डॉ.म.बा. कुलकर्णी
शबरी ही राम-भक्तांपैकी एक प्रख्यात भक्त-स्त्री आहे. ईश्वरसेवा अथवा ईश्वरभक्ती करण्याचा अधिकार सर्व भारतीय धर्मपंथांमध्ये पुरूषांइतकाच स्त्रियांनाही आहे. स्वर्गप्राप्तीच नव्हे तर मोक्षप्राप्तीही करून घेण्याची क्षमता पुरूषांइतकीच स्त्रियांमध्येही आहे, आणि मोक्षमार्गावरील स्त्रियांची काही उदाहरणे भारतात वैदिक काळापासून आजतागायत उपलब्ध आहेत. स्त्रीपुरूष समानता हा विचार भारतीय संस्कृतीला नवीन नाही. उल़ट स्त्रीबद्दलचा आदरभाव हे या संस्कृतीचे एक वैशिष्ट्य मानले पाहिजे. त्यामुळे, शबरी केवळ स्त्री असल्याने तिच्याबद्दल कोणताही न्यूनभाव मनात येऊ न देता भारतीयांनी ती एक रामभक्त स्त्री आहे या एकाच विचाराने तिच्याबद्दल आदर बाळगलेला आहे.
साभार: सांस्कृतिक वार्तापत्र शबरीकुंभ विशेषांक 26-जानेवारी-2006
Leave a Reply
You must be logged in to post a comment.