शबरीकुंभ व वनवासी विकास
श्री. प्रकाश काळे
प्रयाग, उज्जैन, हरिद्नार आणि नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरतो हे सर्वश्रृत आहे. समाजाचे एकत्व आणि धार्मिक, अध्यात्मिक अधिष्ठान लाभलेले हे चार ठिकाणचे कुंभ भारतीय परंपरा, श्रध्दा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे.असे कुंभमेळे सामाजिक आस्था, विश्वास, श्रध्दा यावर आधारित धर्म संरक्षणाचे आणि उत्थापनाचे कार्यक्रम असतात. परंपरेने आलेले हे कुंभ आजच्या बदलत्या समाज रचनेशी सुसंगत असले तरी स्वाभिमानी, स्वावलंबी व शक्तिसंपन्न राष्ट्रनिर्माणासाठी शबरी कुंभा ची संकल्पना मूर्त स्वरूपात आणून राष्ट्रार्पण करण्याचा मानस आहे. म्हणजेच या पुढे पाच कुंभमेळ्याची श्रध्दावान परंपरा सुरू होईल. हा प्रथम कुंभमेळा गुजरातमधील डांग जिल्ह्यात पंपासरोवराच्या पावन भूमित माघ पौर्णिमेला (म्हणजे 11,12,13 फेब्रुवारी 2006) संपन्न होणार आहे.
साभार: सांस्कृतिक वार्तापत्र शबरीकुंभ विशेषांक 26-जानेवारी-2006
Leave a Reply
You must be logged in to post a comment.