PrintPrint complete article.

शबरीकुंभ का?

कुंभ मेळा म्हंटले की त्यामागे धार्मिक कल्पना असतात. कुंभ मेळ्याच्या प्रवकालात त्या पावन क्षेत्रावर स्नान केल्यास मोक्ष प्राप्ती होते असा आमचा समज आहे. शबरीसारख्या सामान्य स्त्रीच्या नावाने हा कुंभमेळा का? तसे पाहू गेल्यास ही शबरी माता आजच्या काळात मागासलेल्या समजल्या जाणार्‍या भिल्ल समाजातील साधी सुधी बाई. आपण रामायण कथेत ही शबरी आणि तीची उष्टी बोरे रामाने खाल्ली ही कथा नेहमी वाचलेली आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया किंवा टीका-टिप्पणी ही आपल्या वाचनात आल्या आहेत. पण रामाला नुसती उष्टी बोरे देणारी ही शबरी खरोखर फार ज्ञानी आणि अपार दुरद्ष्टी असणारी विदुषी होती.


PrintView complete article.